ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप

निक्षय योजने मध्ये कोणीही दानशूर व्यक्ती एक रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकते, एका रुग्णासाठी महिन्याला एक हजार प्रमाणे सहा महिन्याकरिता सहा हजार रुपये खर्च येणार आहे, एक दानशूर व्यक्ती कितीही रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकतो.

ठाणे :  ठाणे शहर क्षय रोग अधिकारी आणि कोव्हीड सेलचे मुख्य डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४८० क्षयरोग रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आले, या वेळी भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष  आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धान्य वाटप करण्यात आले यावेळी उपायुक्त मनीष जोशी, भाजपचे विलास साठे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
या मध्ये निक्षय मित्र या योजनेच्या माध्यमातून जवळपास ४८० क्षयरोग रुग्णांना आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात धान्य किट वाटप करण्यात आले, या योजनेमध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी ३०० रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेतले आहे, व इतर दानशूर   लोकांनी १८० रुग्णांना दत्तक घेतले आहे, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ४८०० रुग्णांनी पोषक आहारासाठी आपले नाव नोंदवले आहे, या पैकी ३८० रुग्णांना पोषक आहार सहा महिने पुरविण्यात येणार आहे , या निक्षय योजने मध्ये कोणीही दानशूर व्यक्ती एक रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकते, एका रुग्णासाठी महिन्याला एक हजार प्रमाणे सहा महिन्याकरिता सहा हजार रुपये खर्च येणार आहे, एक दानशूर व्यक्ती कितीही रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकतो,वेळी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी लोकांना आव्हान केले आहे आपले शहर क्षयरोग मुक्त करायचे असेल तर या योजने मध्ये सहभाग घ्यावा.

 24,406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.